पुणे/मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी जाहीर सभा वा कोणत्याही ठिकाणी त्यांचे मत व्यक्त करताना, कोणत्याही समाजाबद्दल किंवा घटकाबद्दल अवमान होणार नाही अथवा नाराजी ओढवून घेणार नाही याबाबत तारतम्य ठेवूनच बोलले पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी पश्चिम महाराष्ट्रात एका ठिकाणी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यावर निर्माण झालेल्या वादावर पुणे येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्राकडून सुडाचे राजकारण नाही
राज्यात उद्भवलेल्या वीज टंचाईमुळे लोडशेडींग संदर्भात केंद्राकडूनच कोळसा पुरविला जात नसून सुडाचे राजकारण होत असल्याचे सांगितले जाते. यावर देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे. फक्त महाराष्ट्रालाच नव्हेतर नाही देशातील अनेक राज्यांना केंद्र सरकार मागणीनुसार कोळसा पुरवठा करु शकत नाही, असे सांगत सूडाचे राजकारण केले जात असल्याचा दावा पवार यांनी फेटाळला.
परदेशातून कोळसा आयातीचा निर्णय
मुख्यमंत्र्यांसह नितीन राऊत यांनी लोडशेडिंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधे कोळशाची खाण विकत घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरु आहे. छत्तीसगड सरकार काँग्रेसच्या विचाराचे असून सोनिया गांधीं यानी राज्य सरकारला सहकार्य करण्याचेही म्हटले आहे. शिवाय परदेशातून कोळसा आयात करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
समितीच्या शिफारशीनुसारच अधिकाऱ्यांच्या बदल्या
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच मंत्रालय स्तरावर नेमण्यात आलेली आहे. हि समिती शिफारस करते त्यानुसार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे, आणि तो त्यांचा अधिकार आहे. मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या स्थगितीबद्दल काहीही माहिती नसल्याचेही ना. अजित पवार यांनी म्हटले आहे.