Home धर्म-समाज सभा घ्यायची असेल…तर !

सभा घ्यायची असेल…तर !

0
34


औरंगाबाद/मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – औरंगाबाद येथे सभा घ्यायची असेल तर सभेचे ठिकाण किंवा तारीख बदलवा, अशी सूचना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलीस प्रशासनाने केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे जाहीर केले आहे. औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसेचे कार्यकर्ते तयारी करीत असून पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यात यावी, असे पोलिसांकडून सुचविले जात आहे. परंतु मनसेचे पदाधिकारी याच मैदानात सभा घेण्याबद्दल आग्रही आहेत.

मात्र कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी औरंगाबाद पोलिसांनी रमझान ईदनंतर राज ठाकरे यांनी सभा घ्यावी किंवा १ मे रोजी सभा घ्यायचीच असेल तर सभेची जागा बदलावी असे सुचविले आहे.  प्रशासनाने शहरामधील पर्यायी ठिकाणी सभा घ्यावी असे सुचविले असले तरी पदाधिकारी मात्र राज यांच्या घोषणेनुसार मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरच सभा घेण्यावर आग्रही आहेत.


Protected Content

Play sound