बापरे : आता आढळले ओमायक्रॉनचे आठ नवीन व्हेरियंट !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना आता ओमायक्रॉन या आवृत्तीचे आठ नवीन व्हेरियंट आढळून आल्याचा दावा करण्यात आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

देशात पुन्हा कोरोना  रुग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राने अलर्ट दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यात पुन्हा मास्कची सक्ती करण्यात येईल असे संकेत देखील मिळालेले आहेत.

तर दुसरीकडे दिल्लीमधील  रुग्णालयाचे संचालक डॉ. एसके सरीन यांनी कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या  म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे नवीन व्हेरिएंट तयार झाल्याची शक्यता आहे, ज्यामुळे कोविडची प्रकरणं वाढू लागली आहेत. आयएलबीएसमध्ये अनेक नमुने तपासल्यानंतर ओमायक्रॉनचे एकूण ८ नवीन व्हेरिएंट असतील अशी शक्यता बळावली आहे. डॉ. सरीन यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता डॉ. सरीन यांनी लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

Protected Content