जळगाव (प्रतिनिधी) मू. जे. महाविद्यालयाच्या कला विद्याशाखेचे उपप्राचार्य व हिंदी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. सुरेश तायडे यांना नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
१ मे महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कृत केले. डॉ. तायडे यांना प्रसिध्द टि.व्ही. कलाकर अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते पुरस्कार, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिंना भारतीय पत्रकार संघातर्फे मानद सदस्य नियुक्ती पत्रे हि दिले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शिल्पी अवस्थी (मिस इंडिया किताब), माजी आमदार जयप्रकाश छाजेड, वरिष्ट पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, हरिशंकर बॅनर्जी(अध्यक्ष निमा सातपूर), उद्योजक अशोक कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी भारतीय पत्रकार संघाचे खजिनदार व प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी परिश्रम घेतले.