Home Cities अमळनेर धक्कादायक : दोन शाळकरी विद्यार्थींनींचा विनयभंग; संशयिताला अटक

धक्कादायक : दोन शाळकरी विद्यार्थींनींचा विनयभंग; संशयिताला अटक

0
42

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका भागात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी राहते. सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी ही तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत घरी जायला पायी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे संशयित आरोपी असलम खान पठाण रा. देवपुर, धुळे हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला. त्यावर विद्यार्थिनीने हात झटकून इतर मैत्रिणींसोबत पुढे पायी जायला निघाल्या. पुन्हा संशयित आरोपी असलम खान पठाण याने तीनही विद्यार्थिनींचा पुन्हा रिक्षाने पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. यातील दुसऱ्या विद्यार्थिनीचा हात पकडून म्हणाला की, ‘ही नाही येत तर तू तरी चल, आपण दोघे फिरायला जावू’ असे सांगून तिचा देखील विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तीनही विद्यार्थिनी घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी असलम खान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांच्या पथकाने संशयित आरोपी असलम खान पठाण याला अटक केली आहे.


Protected Content

Play sound