Home धर्म-समाज यावल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

यावल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी


यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

यावेळी नाना बोदडे यांनी त्रिशरण पंचशिल म्हटले तर अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावर व त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे गौरव केला. याप्रसंगी प्रभाकर सोनवणे, विजय पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, राष्ट्रवादीचे विजय पाटील, राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे, अय्युब खान, मोहसीन खान, अब्दुल सईद शेख, अरूण लोखंडे, कामराज घारू, गणेश महाजन, बापु जासुद, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी, समिर शेख मोमीन, माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी, राहुल गजरे, नरेन्द्र शिंदे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound