Home क्राईम शेतात जाण्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण 

शेतात जाण्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण 

0
42

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा येथे शेतात गेल्याच्या कारणावरुन तरुणाला काठीने मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील उमाळा येथे बिराडे गल्लीत ज्ञानेश्वर अमत बिऱ्हाडे वय ३० हा तरुण वास्तव्यास आहे. तो शेती करुन उदरनिर्वाह भागवितो. मंगळवार, १२ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर हा त्यांच्या गावातील रघुनाथ साहेबराव चव्हाण यांच्या शेतात गेला होता. शेतात गेल्याचे वाईट वाटल्याने शेतमालक रघुनाथ चव्हाण यांच्यासह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वर यास डोक्यावर तसेच पाठीवर पायावर काठीने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेत ज्ञानेश्वर हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रघुनाथ चव्हाण, शुभम रघुनाथ चव्हाण व भगवान साहेबराव चव्हाण या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound