जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्यासह देशात इंधनाचे दर कमालीचे चढे असून गेल्या महिनाभरात सुमारे ८ ते १० रुपयांच्या वरच हि दरवाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून पेट्रोल डिझेलचे दर काहीसे स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमतीत वाढ होते. भारतात सध्यस्थितीत गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे देखील त्याचा परिणाम होत आहे. शिवाय रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी यानुसार देशभरात तसेच राज्यात देखील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असल्याने दररोज या सुधारित केल्या जातात.
त्यानुसार नाशिक विभागात आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर याप्रमाणे आहेत.
शहर पेट्रोल (प्रति लिटर) पेट्रोल डिझेल
अहमदनगर १२०.४१ १०३.११
नाशिक ११९.९४ १०२.६५
जळगाव १२०.५३ १०३.२३
धुळे १२०.८९ १०३.५७
नंदुरबार १२०.८९ १०३.५८