यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील एका झोपडीला अचानक आग लागल्याने दुचाकीसह सायकलीचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. याप्रकरणी रविवारी १० एप्रिल रोजी दुपारी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंडित रामा श्रीखंडे (वय-४३) रा. दहिगाव ता.यावल हे सलुन दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या घरातच्या बाजूला त्यांचे झोपडी बनवली असून त्याठिकाण दुचाकी व सायकल ठेवतात. शनिवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता ते जेवण करून कुटुंबीयांचा झोपले होते.
दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झोपडीला अचानक आग लागण्याचे गल्लीतील एका तरुणाला समजले. त्याने आरडाओरड केली असता गल्लीतील नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन ही आग विझवण्यात आली होती. तरुणांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आली.
याप्रकरणी पंडित रामा श्रीखंडे यांनी रविवारी १० एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलिसात धाव घेऊन खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.’ या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहेत.