मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या घरासमोर आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा न्यायालयाने दि.१३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच अजून १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अगोदर सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांनी मात्र ‘सदावर्तेंना ११ दिवसांची पोलीस कोठडी द्या’ अशी मागणी केली होती.
मुंबई पोलीसांनी रविवारी अॅड.सदावर्ते यांच्या घराची सुमारे सात ते आठ तास झडती घेतली असून या ठिकाणचे रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासण्यात आले.