Home राजकीय यशोमती ठाकूर म्हणाल्या, पवार साहेब मुख्यमंत्री असते तर… !

यशोमती ठाकूर म्हणाल्या, पवार साहेब मुख्यमंत्री असते तर… !

0
74


अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर कार्यक्रमात ”आज पवार साहेब मुख्यमंत्री असते तर वेगळेच चित्र असते” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवार हे रविवारी अमरावती दौर्‍यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं ? छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.


Protected Content

Play sound