जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापूरा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.
तुषार उर्फ आरू शिवाजी सुरवाडकर (वय-५) रा. गवळीवाडा, तांबापूरा जळगाव असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, गवळीवाडा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात तुषार सुरवाडकर हा चिमुकला व त्याचा मोठा भाऊ महेश आणि गल्लीतील काही मुले गुरूवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी खेळत होते. त्यावेळी मंदीराच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याचा विजेचा जोराचा धक्का बसला आणि तुषारचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर खेळत असलेले लहान मुले बचावले आहे. या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.