Home Cities चाळीसगाव चाळीसगावात सोमय्या यांचा पुतळा जाळून शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन

चाळीसगावात सोमय्या यांचा पुतळा जाळून शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन

0
31

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला यावेळी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करणारे किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली भारतीय लोकांना भावनिक आव्हान करून त्या नावाने करोडो रुपये निधी जमा करून त्याचा गैरवापर करून निधी राजभवनात न जमा करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्या भ्रष्टाचारी व देशद्रोही किरीट सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच शिवसेनेचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि महा विकास आघाडीच्या नेत्यांवर आकस बुद्धीने खोटेनाटे आरोप करून ‘ईडी’ या तपास यंत्रणेचा बाहुल्यासारखा वापर करून केंद्र सरकार करीत असलेल्या गैर प्रकाराचा निषेध म्हणून आज चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येऊन किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound