Home राजकीय निवडणूकीनंतर मायावती तुरूंगात जातील : भाजपा खासदार

निवडणूकीनंतर मायावती तुरूंगात जातील : भाजपा खासदार

mayavati
mayavati

mayavati
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बसपाच्या प्रमुख मायावती या उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी गुंड असून निवडणुकीनंतर त्या तुरुंगाची हवा खातील, असा खळबळजनक दावा केसरगंजचे भाजपा खासदार आणि उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.

 

 

काही दिवसांपूर्वीच मायावतींनी केसरगंजमध्ये महागठबंधनचे बसपाचे उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक सभा घेतली होती. त्या सभेत मायावतींनी बृजभूषण यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी बृजभूषण माफिया आणि गुंडा असल्याचे मायावती म्हणाल्या होत्या. त्यावर बृजभूषण यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मायावतींनी गोंडामधल्या एक रॅलीदरम्यान मला गुंडा म्हटले आहे. मला असे वाटते की त्या स्वतःच गुंड आहेत. त्यांनी मला निवडणुकीनंतर जेलमध्ये घालण्याची धमकी दिली आहे. परंतु निवडणुकीनंतर त्या स्वतःच जेलमध्ये जातील, असेही बृजभूषण म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound