मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा – गेल्या पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उपजीविका गमावू नका, २२ एप्रिल पर्यंत कामावर या! असे आज गुरुवारी ७ रोजी उर्वरित सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे.
बुधवारी एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्याच्या मागण्यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली, तसेच आज गुरुवारी देखील उर्वरित सुनावणी घेण्यात आली. बुधवारच्या सुनावणीवेळी कसोटीच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यानी त्यांचे हातचे उपजीविकेचे साधन गमावू नये, तसेच गेल्या काही दिवसापासून जो त्रास आहे तो जनतेला त्रास नये, असे आवाहन करत कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना करण्यात आली होती, तरी देखील संपकरी त्यांच्या मागण्यावर ठाम असून एड. सदावर्ते सांगत नाहीत तोवर कामावर जाणार नसल्याचीही भूमिका कामगारंची होती. संपकऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सूचना कोर्टाने महामंडळाला केली होती. तसेच आज गुरुवारी देखील उर्वरित सुनावणी नंतर सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घेण्याचे एसटी महामंडळाला आदेश देण्यात आले आहेत.
निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ द्या
कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रजुएत चा लाभ शिवाय एका कर्मचाऱ्याला ३०० रुपये प्रमाणे प्रत्येकी ३० हजार रुपये कोविड भत्ता देण्यात यावा असे कोर्टाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
महामंडळाची अडेलतट्टू भूमिका
ज्या कर्मचाऱ्यांवर संपादम्यान गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले जाणार नाहीत, अशी अडेलतट्टू भूमिका यावेळी महामंडळाने मांडली. या संपामुळे एकही मृत्यू झालेला नको आहे, असे बजावत कर्मचाऱ्यावर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.