जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात भंगार विक्री करणारे वाहनांवर भोंगे लावले जात आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अश्या वाहनांवर कारवाई करून बंदी आणावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपमहापौर कुलभूषण पाटील यांना बुधवार ६ एप्रिल रोजी दुपारी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात ध्वनी प्रदूषण खूप प्रमाणात वाढलेला आहे. शहरात दररोज सकाळी ७ वाजेपासून भंगारवाले त्यांची विनानंबर प्लेट अवैध रिक्षा किंवा छोटे वाहनांवर मोठा प्रकारची जाहिरातीचे भोंगे लावून प्रत्येक प्रभागात फिरत असतात. त्या कारणाने सकाळी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर हा आवाज ऐकून त्रस्त झालेले आहेत. आज रस्त्यावर २० ते ३० वाहन जळगाव शहरात दिसत आहे ते पुढील काही दिवसात प्रमाण वाढून ५०० हून अधिक वाहनांवर भोंगे लावलेले दिसून येणार आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात खूप मोठी वाढ होणार आहे. वाहनांवरील भोंगे काढण्यात यावे व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपमहानगराध्यक्ष अशीष सपकाळे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदनातून मागणी केली आहे.