दोन ट्रकची टक्कर होऊन भीषण आग; दोन चालक जळून खाक

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मलकापूर रोडवर दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोघं चालकांचा जळून मृत्यु झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री 12 वाजेच्या दरम्यान मलकापूर रोडवर वडनेर जवळ (RJ-09-GB-1503) क्रमांकाचे कंटेनर नांदुरा कडून मलकापूरकडे जात असताना व (GJ-04-AW-2191) क्रमांकाचे  कंटेनर मलकापूर कडून नांदुराकडे जात असताना धडक झाली. ही टक्कर इतक्या जोरात होती की, दोघ ट्रकला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाऊंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, पियुष मिहाणी, आनंद वावगे व नगरपरिषद चे कर्मचारी महादेव हींगणकार, रोहित सोनोने, वैभव हींगणकार , राहुल एकडे, नितीन भिडे, अमोल बेलोकार, राजू काटे हे रुग्णवाहिका व अग्निशामक गाडीसह घटनास्थळी हजर झाले व आगीवर काबू केला. परंतु या घटनेमध्ये कंटेनरचे दोनीही चालकाचा जळून मृत्यू झाला.

 

 

 

Protected Content