जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंडीयन मेडिकल असोशिएशन (आय.एम.ए.) जळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या सहकार्याने ‘हॉटेल कमल पॅराडाईज’ येथे संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रविवार, दि.३ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आय.एम.ए. महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.सुहास पिंगळे, आय.एम.ए. महाराष्ट्रचे सचिव डॉ.मंगेश पाटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आय.एम.ए.चे मार्गदर्शक डॉ.उल्हासदादा पाटील, एच.बी. आय बोर्डाचे डॉ.अनिल पाटील, डॉ.स्नेहल फेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ.दीपक आठवले यांनी मावळते अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. यासह नवनिवर्चीत सचिव म्हणून डॉ.जितेंद्र कोल्हे यांनी मावळते सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.
नवनिर्वाचित कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ. सुनील नाहाटा, जॉईंट सेक्रेटरी डॉ.सुशीलकुमार राणे व डॉ.धीरज चौधरी, खजिनदार डॉ.पंकज पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.विनोद जैन, कार्यकारणी सदस्य डॉ.राहूल मयूर, डॉ. पंकज, डॉ.किशोर पाटील, डॉ.अनघा चोपडे, डॉ.सारिका पाटील, डॉ.दीपक पाटील यांची निवड करण्यात येऊन त्यांचा पदग्रहण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दि.३एप्रिल या दिवशी डॉ.अनिल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला यावर्षीपासून दोनशे मेडिकल जागा देण्यात आल्यामुळे यासाठी सर्वांनी डॉक्टर उल्हास पाटील व गोदावरी फाउंडेशनला शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी बोलताना आय.एम.ए. अध्यक्ष डॉ.सुहास पिंगळे व सचिव डॉ.मंगेश पाटे यांनी ‘आय.एम.ए.’कडून असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन आपण सगळ्यांनी सोबत काम करावे व डॉक्टरांशी निगडीत जनमान्य प्रश्न सोडवण्यासाठी हिरीरीने भाग द्यावा अशी सूचना केली.
डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात “महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या कामांचा गौरव केला. जळगाव आय.एम.ए. पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील एसबीआय बोर्डाची कॉन्फरन्स घेण्यासाठी परवानगी मिळावी व त्यासाठी गोदावरी फाऊंडेशन व आय.एम.ए. जळगाव पूर्ण तयारीनिशी त्याला यशस्वी करेल.” असे सांगितले. तसेच त्यांनी डॉ.अनिल पाटील व डॉ.स्नेहल फेगडे हे राज्यस्तरावर आय.एम.ए. साठी झुरत असून राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात यावे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे सुचविले.
नवीन अध्यक्ष व सचिवांनी आपले मनोगत व्यक्त करून “जळगाव ‘आय.एम.ए’ चा वारसा अजून जोमाने पुढे घेऊन डॉक्टरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊया असा निर्धार व्यक्त केला.” याप्रसंगी ‘आय.एम.ए.’चे सभासद, नातेवाईक व मित्रपरिवाराची उपस्थिती होती.