Home Cities जळगाव उत्कृष्ट सेवेनिमित्त रेल्वे कर्मचारी सन्मानित

उत्कृष्ट सेवेनिमित्त रेल्वे कर्मचारी सन्मानित

0
29

  जळगाव  लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मध्य रेल्वे भुसावळ विभागातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याना डीआरएम एस.एस.केडिया यांच्या हस्ते 66 व्या रेल्वे सप्ताह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात ९ अधिकारी आणि २६२ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

भुसावळ मध्य रेल्वे विभागात गृप सी, डी यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना कृष्णचंद्र सभागृह येथे सन्मानचिन्ह, ५ लाख ३१ हजार रुपये रोख रकमेसह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात १४ गृप अवार्ड, १० सन्मानचिन्ह आणि ९ ऑफीसर्स यांचेसह २६२ कर्मचारी, महिला कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया, रुकमैय्या एम ए, एडीआरएम नवीन पाटील, रेल्वे महिला संघ अध्यक्ष डॉ. पाटील, महिला सदस्या, आदी उपस्थित होते. सार्व.टेलीफोन विभागाचे किशोरकुमार यांचेसन अन्य अधिकारी कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गीत सदर केलें. सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य कुळकर्णी यांनी तर आभार रामटेके यांनी मानले.


Protected Content

Play sound