मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होणारे सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ‘एप्रिल’ महिन्यात आणि ‘रविवार’ या सुटीच्या दिवशीही शाळा सुरु ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोरोना कालखंडात शाळा बंद असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही कसरत होत होती. त्यामुळे एप्रिल महिन्यातही शाळा सुरु रहावी यासाठी पालक वर्गाकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीकडे लक्ष देत शालेय शिक्षण विभागाने आता एप्रिल माहिन्यातही पूर्णवेळ शाळा सुरु ठेवण्यास मुभा दिली आहे.
शासनाच्या या धोरणामुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘एप्रिल’ महिन्यात देखील शाळा सुरू राहणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होणारे सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ‘रविवार’ या सुटीच्या दिवशीही शाळा सुरु ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांकडून मागणी करण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे.