जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रात्री झालेल्या हल्ल्यात समता नगरातील मृत्यू झाल्याच्या घटनेने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच शिवाजीनगरात पुन्हा एकदा खून झाल्याने शहर हादरले आहे.
शहरातील समता नगरात काल रात्री झालेल्या हल्ल्यात सागर नरेंद्र पवार या तरूणाचा आज पहाटे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यानंतर आज शिवाजी नगर परिसरात सुध्दा खून झाला.
शिवाजीनगरा भागातील रहिवासी नरेश आनंदा सोनवणे याच्यावर चॉपरने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. समतानगरातील खून करणार्याला पोलिसांनी गजाआड केले असून शिवाजीनगरात झालेल्या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.