जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील आदर्शनगरात झालेल्या घरफोडीत आरोपीसह सहकाऱ्यांनी जबरीने अंगावरील दागिने आणि घरातील रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेत खून प्रकरणात आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाचा सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंड सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर आदर्श नगरात असलेल्या दगडू देवरे आणि जिजाबाई देवरे हे दाम्पत्य 1 मार्च 2017 रोजी घरात झोपलेले असतांना रात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास आरोपी मनोजसिंग सिकंदरसिंग टाक यांने आपल्या साथीदाराच्या मदतीने दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत जिजाबाई देवरे यांच्या आंगावरील सोन्याचे दागीने आणि घरातील रोक रक्कम जबरीने चोरून नेत असतांना मयत दगडू देवरे यांनी प्रतिकार केला असता. त्यांना लोखंडी वस्तून वार केले होते. त्यांन दगडू देवरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलीसात मयत दगडू देवरे यांचा मुलगा नितीन देवरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तपासाधिकारी रामेश्वर पाटील यांनी आरोपी मनोजसिंग टाक याला 12 एप्रिल 2017 रोजी अटक केली. त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यात मूळ फिर्यादी नितीन देवरे, डॉ. दिनेश देवराज, डॉ. डी.पी. बावीस्कर, तहसिलदार कैलास देवरे व ओळख परेड पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यात जिल्हा न्यायालयात न्या. जे.पी.दरेकर यांनी आरोपी मनोजसिंग टाक याला दोषी ठरवत दहा वर्षाची सश्रम करावास आणि एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शिला गोडंबे यांनी कामकाज पाहिले. दरम्यान ॲड. शिला गोडंबे यांनी सरकार पक्षाची उत्कृष्टपणे बाजु मांडून या दोन आवड्यात सलग चौथ्या प्रकरणात शिक्षा सुनावणी झाली.