Home क्राईम गतीरोधकावरून दुचाकी घसरल्याने दोघे गंभीर जखमी

गतीरोधकावरून दुचाकी घसरल्याने दोघे गंभीर जखमी


accident 1

जळगाव प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने दोघे मित्र घरी येत असताना रस्त्यावर आलेल्या स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने दुचाकी घसरून पडल्याने या अपघातात दोघेजण जखमी झाले. दोघांना खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

याबाबत माहिती अशी की, समाधान शांताराम चौधरी वय 25 राहणार पाळधी ता. धरणगाव आणि सहकारी मित्र मधुकर मिस्तरी (वय 55, रा.अमळनेर ह.मु. पाळधी ता.धरणगाव हे दोघे दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीएल 8076) चोपडा सावखेडा रस्त्यावरून पाळधीकडे जात असताना सावखेडाजवळ अचानक मोठा स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीवर मागे बसलेला मधुकर मिस्तरी हा गाडीवरून मागच्या मागे पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाला. समाधान शांताराम चौधरी यांना हाताला व छातीला मार बसला आहे. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound