Home क्राईम ‘त्या’ नराधमाला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

‘त्या’ नराधमाला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी


पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पहूर पोलीसांनी अटक केली. त्याला २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी गणेश शांताराम पवार (वय-२८) याने १८ मार्च रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून गाडीत बसवून पळविले होते. त्यानंतर पिडीत मुलीला पहूर गावाजवळील रस्त्यावर तिच्यावर जबरी अत्याचार केला. याप्रकरणी पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पहूर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविले. संशयित आरोपी गणेश शांताराम पवार याला पहूर पोलीसांनी अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आला आहे. पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहे.


Protected Content

Play sound