Home क्राईम चंदू आण्णा नगरातून एकाची दुचाकी लांबविली

चंदू आण्णा नगरातून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर परिसरातून एकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल ज्ञानेश्वर पाटील (वय-३०) रा. चंदूअण्णा नगर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता ते दुचाकीवरून कामावरून घरी आले. त्यावेळी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी (एमएच १९, सीडी २२०३) क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २० मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीला आला. प्रफुल्ल पाटील यांनी परिसरात दुचाकीच्या शोधाशोध केली परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी सोमवारी २१ मार्च रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल तायडे करीत आहे.


Protected Content

Play sound