मलकापूर, अमोल सराफ | तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रपत्र ड यादीतील अपात्र अर्जदार आज गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकले. त्यांची मागणी मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे बीडीओंना आंदोलक महिलांनी यावेळी दिला.
मलकापूर येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे अॅड. नाझेर काझी आणि संतोषभ रायपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळू पाटील व अरुण अग्रवाल यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांची निवेदने घेऊन हजारोंच्या संख्येने वंचित अर्जदार आज एकवटले. त्यांच्या मागण्यामध्ये अपात्र यादीतून त्यांना पात्र यादीत स्थान मिळावे. घरकुल अनुदान तीन लाखांपर्यंत मिळावे. घरकुल प्रश्न तातडीने मार्गी लागावा हे मुख्य मुद्दे होते. जर लवकर यावर तोडगा निघाला नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन किंवा चक्काजाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील आलेल्या महिलांनी त्यांचा आक्रोश फोडला. जुने कॉटन मार्केट ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत पायी जात असंख्य माता भगिनींनी त्यांचे निवेदन बीडीओना दिले. विशेष म्हणजे आज सुट्टीचा दिवस असतानाही बीडीओ यांनी ऑफिस उघडून निवेदन स्वीकारले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/308989124662861