जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही.मागील चार दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
आज गुरुवार दि. १७ मार्च रोजी दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५३४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.