जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथील मेडिकल स्टोअर्सचे चालक नरेंद्र खलसे यांच्यावर प्रिस्कीप्शनविना औषधी न दिल्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्लेखोऱ्यास अटक करण्यात यावी अशी मागणी युवासेनेतर्फे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, शिरसोली येथील समर्थकृपा मेडिकल स्टोअर्सचे मालक नरेंद्र अमृत खलसे ह्या केमिस्टवर एका व्यक्तीने त्यास नशेच्या औषधी न दिल्याने चॉपर हल्ला केला व त्याला गंभीर जखमी केले आहे. अन्न व औषधी कायद्यानुसार अशा गुंगी येणाऱ्या, नशा येणाऱ्या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. परंतु दुकानावर येणारे असे काही व्यसनी व्यक्ती अशा प्रकारच्या गुंगीच्या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न दिल्याने केमिस्ट लोकांना शिवीगाळ करून मागतात, न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आजचे केमिस्ट बांधव या अशा लोकांमुळे नेहेमी जीव मुठीत घेऊन व्यवसाय करताना आढळून येतात. केमीस्टवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही युवासेना जळगावतर्फे जाहीर निषेध करीत आहोत. या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, सदर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारची हिम्मत पुन्हा कोणी करणार नाही. निवेदनावर युवासेना सहसचिव विराज कावडीया , महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, यश सपकाळे, ,प्रितम शिंदे, शंतनु नारखेडे आदींची स्वाक्षरी आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1015083139134947