बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वारंवार वीज देयकाच्या रकमेची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकोला परिमंडळात सुमारे १५ हजार थकबाकीदार वीज ग्राहकांना मागील दोन महिन्यात शॉक देत त्यांचा वीज पुरवठा तात्पुरता अथवा कायम स्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या अकोला परिमंडळात अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्याचा समावेश होतो. वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकाकडे २१ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १० कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. अकोला जिल्ह्यात ४०७१ वीज ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख रुपयांची, बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार २४२ वीज ग्राहकांकडे ५ कोटी २१ लाख रुपयाची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महावितरणच्या तांत्रिक पथकासोबत वित्त व लेखा, मनुष्यबळ विभागातील कर्मचारी देखील वसुलीच्या कमला लावले आहेत. अकोला मंडळातील २७६ वीज ग्राहकांचा, अकोला शहर विभागातील ३०५, अकोट विभागातील ४४१, बुलढाणा विभागातील २८६, खामगाव विभागात ३१, मलकापूर विभागातील ४४९ आणि वाशीम विभागातील ६२६ थकबाकीदार घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. घरगुती सोबतच वाणिज्य, सार्वजनिक पाणी पुरवठा, पथ दिवे,औदयोगिक क्षेत्रातील थकबाकीदार वीज ग्राहकांचा देखील वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येत आहे. महावितरण देखील वीज निर्मिती आणि पारेषण कंपनीची ग्राहक आहे. निर्मिती कंपनीला वीज खरेदीसाठी आणि पारेषण कंपनीला वीज वाहून आणण्यासाठी महावितरणला पैसे मोजावे लागतात. यम थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून सहकार्य करावे आणि महावितरणकडून कारणात येणारी कटू कारवाई टाळावी, असे आवाहन वीज ग्राहकांना करण्यात येत आहे.