जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोमवार, १४ मार्च रोजी प्रा.एस.टी.इंगळे यांनी स्वीकारला.
प्रा.एस.टी.इंगळे यांची विद्यापीठाचे प्र-कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) म्हणून कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी नियुक्ती केली आहे. प्रा.एस.टी.इंगळे हे विद्यापीठाच्या पर्यावरण व भूविज्ञान प्रशाळेत वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याना ३१ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. प्रा.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली असून ०६ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत. प्रा.इंगळे यांची ०३ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचे राष्ट्रीय ५० व आंतरराष्ट्रीय पातळीवर ४९ शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. आठ संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, या पदासह विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे.
सोमवारी प्रा.एस.टी. इंगळे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, माजी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा. के.एफ.पवार, उपकुलसचिव विकास तळेले आदी उपस्थित होते.