Home क्राईम वृद्ध आईला काढले घराबाहेर ; मुलासह सूने विरोधात गुन्हा

वृद्ध आईला काढले घराबाहेर ; मुलासह सूने विरोधात गुन्हा

0
75


बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुलाने आईच्या नावावर असलेले घर स्व:ताच्या नावावर करुन घेतले. दरम्यान, मुलांने चौऱ्यांशी वर्षे आईला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथे घडली. याप्रकरणी मुलासह सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खामगांव शहरातील बर्डे प्लॉट् भागातील मुलगा शेख आसिफ अब्दुल रज्जाक  याने आई रहेमत नबी अब्दुल रज्जाक (वय 84) यांचा विश्वासाघात करत त्याचे घर स्वतःच्या नावावर बक्षीस पत्र करून घेतले. तसेच रहेमत रज्जाक यांना मुलगा व सुनेने मारहाण करून घराबाहेर काढून दिले. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी मुलगा शेख आसिफ अब्दुल रज्जाक व सुन शेहनाजबी शेख आसिफ दोघांविरुद्ध 323, 504 भादवी सहकलम जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण कल्याण अधिनियम 2007 चे कलम 23,24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 


Protected Content

Play sound