Home क्राईम मोहाडी रोडवर महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविली धुमस्टाइल 

मोहाडी रोडवर महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविली धुमस्टाइल 

0
114
mangalsutra 11
mangalsutra 11


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील मोहाडी रोडवर शतपावली ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगलपोत चोरट्यांनी धूमस्टाईल लंपास झाल्याची घटना शुक्रवार 11 मार्च रोजी रात्री 8 वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील मोहन नगरातील रहिवाशी वैशाली प्रकाश पाचपांडे (वय – ५०) हे महाबळ येथून मोहाडी रोडकडे शतपावली करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने येऊन १ लाख रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लंपास केल्याची घटना ११ मार्च सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरटे हे अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट दिली. पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारावर तपास सुरू आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलिस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound