स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी मोबाईलचे व्यसन सोडा – उपनिरीक्षक समाधान गायकवाड

सावदा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलचे व्यसन विद्यार्थ्यांनी सोडावे असे आवाहन उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी केले. ते अध्यापक विद्यालय खिरोदा येथील शिक्षक व्यक्तीमत्व या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

समाधान गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षा व विधीग्रस्त संघर्ष बालकाचा शिक्षणाशी असलेला संबध या विषयावर त्यांनी छात्रध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे सांगितले की, स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असतांना काही प्रमुख बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रथम स्वतःचे ध्येय ठरवावे. इतिहास, भुगोल , राज्यशास्त्र याविषयांचा सखोल अभ्यास करावा. सर्व कंन्सेप्ट क्लीअर करून घ्यावे. अपुर्ण ज्ञानाने किंवा अपुर्ण अभ्यासाने राज्यसेवेची परीक्षा देवू नका. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, स्वतः मी तीनशे पासष्ट दिवसांपैकी फक्त पंधरा दिवस इतर कामांसाठी वेगळे काढले होते. तीनशे पन्नास दिवस राज्यसेवेच्या परीक्षेला दिले. या काळात मी मोबाईलला हातसुध्दा लावला नाही असे सांगत तरुणाईमधील मोबाईलचे व्यसन त्यांच्या प्रगतीच्या आड येत असल्याचे त्यांनी स्पष्ट करत हे व्यसन सोडावे लागेल असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य म्हणून बी. एस. तायडे यांनी छात्रध्यापकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. पी. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. हेमांगी चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन छात्रध्यापिका चैताली जोगी यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content