Home Cities चोपडा अनिलराज पाटील यांना आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्र प्रदर्शनात अवॉर्ड

अनिलराज पाटील यांना आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्र प्रदर्शनात अवॉर्ड

0
31


चोपडा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या चित्राला आर्ट सिटी 7 दिल्ली यांच्या ऑनलाईन चित्र प्रदर्शनात व्यावसायिक गटात अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

 

फेब्रुवारी महिन्यात आयोजित अंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनीत भारत देशातून नामवंत कालावतानी सह्भाग घेतला होता. या पूर्ण स्पर्धेचे आयोजक आनंद कुमार यांनी अनिलराज पाटील यांच्या चित्राला पुरस्कार दिला. चित्रकारने कलेची देवता श्री गणेशचे खूप वेगळया शैलीतील चित्र बनवलं आहे. अष्टविनायक श्री थेऊरचा चिंतामणी याबद्दल चित्रकाराचे गुरु राजू बाविस्कर, चंद्रशेखर कुमावत, मिलिंद विचारे, चित्रकला महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल राजेंद्र महाजन् या यांचे मार्गदर्शन लाभले. याआधीही अनिलराज पाटील यांच्या चित्राची पाच अंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound