जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगांव, व विद्यार्थी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या वतीने डॉ. अण्णासाहेब जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ५६ विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालयात माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या सहकार्याने महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ५६ विद्यार्थिनी व महिलानी हिमोग्लोबिन तपासणी केली.
यावेळी अभाविप प्रांत विद्यार्थिनी प्रमुख प्रतिमा याज्ञिक, गोळवलकर रक्तपेढी रक्त संकलन अधिकारी डॉ. नीलिमा वैद्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरचे नगर मंत्री मयूर माळी भूमिका कानडे, नितेश चौधरी, मनीष चव्हाण , भाग्यश्री कोळी , हिमानी महाजन,अनिकेत महाजन आदि कार्यकर्ते उपस्थित होते. नीलिमा वैद्य यांनी विद्यार्थिनींना निरोगी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रतिमा याज्ञिक, नगर मंत्री मयुर माळी यांनी केले. सूत्रसंचलन पल्लवी मिसार यांनी तर गीत गौरी पुंडे यांनी सादर केले. परिचय शीतल पाटील यांनी केला.