लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; एकाला अटक

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत २४ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी आकाश संजय काळे याने २४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानुसार तरूणीला भुसावळ शहरातील एका हॉटेलमध्ये २६ फेब्रुवारी रोजी घेवून गेला. मध्यरात्री तिच्यावर तीन वेळा शरिरीक संबंध प्रस्तापित करून अत्याचार केला. तरूणाचे दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा देखील झाला असतांना त्याने तरूणीवर अत्याचार केला आहे. पिडीतेने भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश संजय काळे याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला हे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ पोलीसांनी संशयित आरोपी आकाश संजय काळे याला अटक केली आहे.

 

 

 

Protected Content