Home प्रशासन तहसील पिंपळगाव (हरे) येथील घरकुल संदर्भात राष्ट्रवादीचे निवेदन

पिंपळगाव (हरे) येथील घरकुल संदर्भात राष्ट्रवादीचे निवेदन

0
50


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरे) येथील प्रलंबित असलेल्या घरकुल योजनांची सखोल चौकशी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.

 

येथील घरकुल वाटपात पंचायत समितीचे काही कर्मचारी मुद्दाम खोडा घालत असून आदिवासी समाजाच्या पात्र लाभात्र्यांना “ड” यादीतून काढून मुद्दाम, हेतुपुरस्सर “क” यादीत टाकले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन राष्ट्रवादीने दिले आहे.

 

याप्रसंगी माजी आ. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, प्रवक्ते खलिल देशमुख, मा. तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील, गौरव शिंदे, राष्ट्रवादी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष जमील तडवी, मा. ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, अभिषेक सूर्यवंशी, समसुदीन तडवी, रफिक शेख, हासन शहा, इस्माईल शेख, नसीब खान, मुस्ताक शेख, शकील पठाण, जावेद तडवी, बिस्मिल्ला तडवी, रहमान शेख, रुबाब शहा, सद्रोद्दिन तडवी, ईदबार तडवी, सादिक तडवी, हनीफ शहा यांचे उपस्थितीत दिले. असून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी यात लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देऊ अस आश्वासन दिलं, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडु असा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी यावेळी दिला.


Protected Content

Play sound