Home Agri Trends बुलढाण्यात सातबारा कोरा करण्याची अभिनव स्तुत्य संकल्पना 

बुलढाण्यात सातबारा कोरा करण्याची अभिनव स्तुत्य संकल्पना 

0
69

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बुलढाण्यातील शेतकरी ज्ञानेश्वर धोंडगे यांनी चक्क व्यवसायाचे नाव सातबारा रसवंतीगृह ठेऊन सातबारा कोरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली आहे.

निसर्ग नेहमीच विशेषता शेतकऱ्याला उसंत घेऊ देत नाही, विविध निसर्गाचे रूप दाखवत त्यांना अडचणीत आणतो पण या दृष्ट चक्रातून कायमस्वरूपी बाहेर पडणे आम्हाला 24 तास वीज आणि पाणी द्या आम्ही स्वतः कर्जमुक्त होऊ त्याकरता आम्ही सक्षम आहोत घाम गाळून पैसा कामावु आणि सातबारा कोरा करू याच दृष्टिकोनातून

मेहकर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वर मोतीराम धोंडगे या शेतकऱ्याने उसाची पेरणी केली परंतु कारखानदार आणि ठेकेदार (मुकदम) हे लोक पैसे देण्यास उशीर करतात आणि माल सुद्धा उशिरा नेतात म्हणुन याला पर्याय देत या शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतामध्येच रसवंती चा व्यवसाय सुरू करून रसवंती चे नाव सातबारा ठेवले आपला सातबारा स्वतःच कोरा करण्याकरिता एक अभिनव व्यवसायातून मार्ग निवडला आहे ज्ञानेश्वर दररोज हजार रुपये चा व्यवसाय रसवंती वर करतो त्यातून समाधानकारक योग्य निव्वळ नफा त्याला मीळत आहे. त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकीकडे शेतकरी निसर्गाच्या संकटातून बाहेर पडण्याकरिता सरकारकडे दाद मागतो आणि नेहमी त्यांना रिकामा हातने परतावे लागते हे कायमस्वरूपी सुटण्याकरिता चक्क सातबारा ला आपला प्रेरणास्त्रोत समजून व्यवसायातून मार्ग निवडणूक हाच पर्याय प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी अवलंबला तर सातबारा कायमस्वरूपी कोरा होईल कारण आपल्या व्यवसायात आपल्या शेतीतील उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत दिल्यास व्यवसायाचा दर्जा उंचावतो असे मुंबई येथील वास्तव्य असलेल्या एका ग्राहकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं व या शेतकऱ्याचे कौतुक केले.

ज्या पद्धतीने या शेतकऱ्याने सातबाराला आपले प्रेरणास्त्रोत बनवले आहे आणि येणारा काळात शेतीला जोड धंदा ची साथ देणे गरजेचे आहे आणि तेव्हाच सातबारा कोरा होत त्यावर बोजा देखील कमी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 


Protected Content

Play sound