रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विटवा गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर महसूल पथकाने पकडले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विटवा गावाजवळून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रावेर महसूल पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी जी.एन. शेलकर, कोतवाल विना अटकाळे, यांनी कारवाई केली आहे.