शिरसोली येथे मनसे जनहित कक्षातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथपूजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली प्र. न येथे महाराष्ट्र नवनिर्मान सेना जनहित कक्षातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथपुजन करण्यात आले .

 

मराठी राजभाषा दिनानिमित्त  मायबोली मराठी भाषेत असलेले ग्रथांची माहिती महाराष्ट्र नवनिर्मान सेना जनहित कक्षातर्फे देण्यात आली. डीजीटल युग आल्यामुळे ग्रंथवाचनाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे . ग्रंथवाचनाची आवड निर्माण व्हावी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी आपण आपल्या भाषेचा आदर राखावा या दिनानिमित्त संकल्प करण्यात आला . मोठया उत्साहात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्मान सेना जनहित कक्षाचे जळगाव तालुका उपाध्यक्ष मनोज लोहार,रवी पाटील,किशोर आंबटकर, श्रीकांत बारी, विठ्ठल अस्वार,राहुल माळी,सागर पाटील, राहुल कलाल, भुषण पाटील,प्रशांत लोहार, राहुल चव्हाण, चंद्रकांत महाजनआदी उपस्थितहोते.

Protected Content