Home आरोग्य खडकदेवळा येथे विषबाधेने ८० मेंढ्या मृत्युमुखी

खडकदेवळा येथे विषबाधेने ८० मेंढ्या मृत्युमुखी


f228f282 de54 42cb 83ca b3adee4651e9

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकदेवळा धरणाजवळ पाणी पिण्यासाठी जात असतानाच दुरई खाल्याने जवळपास ८० मेंढ्या दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे धनगर बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे.

 

खडकदेवळा येथील धरणातील पाणी पिण्यासाठी जात असतांनाच दुरई नावाची खाल्याने जवळपास ८० मेंढ्या दगावल्या आहेत. या मेंढ्या नगरदेवळा येथील महादु भिमा खांडेकर यांच्या मालकीच्या होत्या. त्यांचे सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कॉग्रेसचे आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी यांनी पोलीसात खबर दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ए.आर. महाजन यांनी मेंढ्यांचे पोस्टमार्टेम केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound