Home Cities अमळनेर कळमसरे येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांड्यांचे वाटप

कळमसरे येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांड्यांचे वाटप

0
105

अमळनेर  – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत ग्रामनिधीतून व मागासवर्गीय लोकांच्या वीस टक्के लोकांचे निधी सन २०२१/२२ या वर्षातून सार्वजनिक कार्यक्रमासाठी ६० हजार रुपये किंमतीचे भांड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी  सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मिराबाई बडगुजर, लताबाई भिल, रेश्माबाई चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी , ग्रामविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र पाटील सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते भांडयांचे वाटप करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी एस डी सोनवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गावातील उखा होलर, कैलास चव्हाण, देविदास चव्हाण, मनोज चंदनशिव, मधुकर निकम, किरण भिल, किशोर मालचे, रणसिंग पवार, किशोर निकम, रघुनाथ भिल सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे सर्व समाज बांधव उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound