जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघनगरातील भाजीपाला विक्रेत्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, “शहरातील वाघनगर स्टॉपजवळील रहिवासी मनोज मधुकर मिस्तरी (वय-५०) हे आपल्या कुटंबियांसह वास्तव्यास आहेत. ते भाजीपाला विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसतांना मनोज मिस्तरी यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
त्यांचा मुलगा घरात आला असता त्याला आपल्या वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रामनंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत पाठक व उमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवित तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.