कांग नदीच्या पुलाखाली मामे भावानेच केला ‘तो’ खून; संशयिताला अटक

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळच असलेल्या कांग नदीच्या पुलाखाली बोदवड येथील तरूणाचा खून करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवडातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पवन अशोक माळी रा. बोदवड असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शुभम नंदू माळी (वय-२०) रा. दत्तनगर बोदवड हा तरूण भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होता. ३१ जानेवारी रोजी सकाळी जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती बोदवड पोलीसांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलीसांनी धाव घेवून माहिती घेतली असता हा मृतदेह शुभम माळी याचा असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने कसून चौकशी केली बाजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज वरून असता बोदवड येथील मयताचा मामेभाऊ पवन अशोक माळी रा. बोदवड यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. दोघांमध्ये पैश्यावरून भांडण झाल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवन माळी याला ताब्यात घेतले व चौकशी केली.  पोलीसांनी खाक्या दाखवताचा पवन माळी याने पैश्यांच्या वादातून नंदू माळी याचा  खून केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पथकाने अटक केली. पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन,सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, पोना मुरलीधर बारे यांनी कारवाई केली.

Protected Content