जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या ममुराबाद शिवारातून अज्ञात चोरट्यांनी तीन विद्युतपंपाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे.
जळगाव तालुका पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ गोवा शिंदे वय ३५ रा. शिंदेवाडा ममुराबाद ता.जि. जळगाव यांचे ममुराबाद शिवारात शेत आहे. दि. ९ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान सोमनाथ शिंदे यांच्या शेतातील विहिरीत लावलेले विद्युतपंप मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याच शिवारातील इतर दोन जणांच्या देखील विद्युत पंपाची चोरी झाल्याचे समोर आले. याबाबत शेतकऱ्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.