Home Cities जळगाव सुरज नारखेडे यांचा होणार खान्देश रत्न पुरस्काराने गौरव

सुरज नारखेडे यांचा होणार खान्देश रत्न पुरस्काराने गौरव

0
111

जळगाव – लाईव्‍ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सप्तरंग इव्हेंट ऍन्ड मॅनेजमेंटतर्फे राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे यांना २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वा. हॉटेल फोर सिझन येथे खान्देश रत्न सोहळा २०२२ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. खान्देशातील शिक्षण, कला, क्रिडा, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, पोलीस दल, वकिली, व्यवसायिक, आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी सिने अभिनेते तेजश्री प्रधान, खानदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

 

 


Protected Content

Play sound