Home राजकीय सावद्यात ‘शरद युवा संवाद यात्रा व सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन

सावद्यात ‘शरद युवा संवाद यात्रा व सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन

0
19

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शरद युवा संवाद यात्रा व सदस्य नोंदणी अभियानाचे सावदा येथे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आयोजीत ‘शरद युवा संवाद यात्रा व सदस्य नोंदणी अभियान’ सावदा. तालुका रावेर येथे संपन्न होणार आहे.

या अभियानच्या उद्घाटनप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

हा कार्यक्रम ‘जेहरा मॅरेज हॉल’ सावदा, तालुका रावेर येथे रविवार, दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल आहे. या कार्यक्रमास सर्व सेलच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन सावदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सावदा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound