पारोळा तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न

पारोळा प्रतिनिधी | माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आजोजित शरद युवा संवाद यात्रा शनिवार दि. ५ फेब्रुवारीपासून जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

शरद युवा संवाद यात्रा राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख व जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते व मान्यवर यांच्या उपस्थित प्रत्येक तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. पारोळा तालुक्यात शरद युवा संवाद यात्रा दि. ९ फेब्रुवारी रोजी येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन आढावा बैठक आज राष्ट्रवादी कार्यालय पारोळा येथे जि. प. सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, तालुका अध्यक्ष यशंवत पाटील , मा. प. स. उपसभापती चंद्रकांत पाटील, जेष्ठ नेते आर. व्ही. पाटील सर, डिगंबर बापू पाटील, किसान सेल तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, माजी युवक अध्यक्ष दिलीप पाटील, शहर अध्यक्ष गणेश पाटील ,दगडी सबगाव्हन् सरपंच नंदलाल पाटील, हीरापुर सरपंच वाल्मीक पाटील, कन्हेरे सरपंच बिभीषन पाटील ,युवक जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटिल, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकड़े ,युवक तालुका कार्याध्यक्ष अक्षय निकम ,युवक जिल्हा सरचिटणीस उद्धव पाटील ,युवक तालुका उपाध्यक्ष अक्षय वाघ ,युवक तालुका उपाध्यक्ष सनी निकम ,तालुका सरचिटणीस रोहित पाटील, तालुका युवक तालुका उपाध्यक्ष समाधान पाटील ,युवक तालुका उपाध्यक्ष मुकेश पाटील .युवक तालुका सरचिटणीस निलेश पाटील ,युवक तालुका सरचिटणीस प्रकाश पवार .युवक तालुका सरचिटणीस हिरामन वाघ, डी.   के. पाटील, मनोज पाटील, मधुकर पाटील रताळे, महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा पाटील,  महिला शहर अध्यक्ष अन्नपूर्णा पाटील, तालुक्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content