अंतरराष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेसाठी मारूळ येथील तीन खेळाडूंची निवड; गावकऱ्यांनी केला सत्कार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथील तीन खेळाडूंचा अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने मंगळवार १ फेब्रुवारी रोजी सरपंच  सैय्यद असद जावेद अली व गावकऱ्यांच्यावतीने तिघांचा सत्कार करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील मारूळ येथील राहणारे सय्यद मोहम्मद हसन, शादाब हजरत अली यांची महाराष्ट्र राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे तर १७ वर्षे वयोगटातील शुटींग बॉल स्पर्धा साठी मोहम्मद समी शहजाद यांची देखील अंतरराष्ट्रीय पातळीवरील शूटिंगबॉल स्पर्धेसाठी स्पर्धा मध्ये निवड झाली आहे. गेल्या वर्षी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेत राज्य शुटींगबॉल असोशिएसनचे राष्ट्रीय खेळाडुंची त्यांची उत्कृष्ठ खेळामुळे त्यांची अंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडु सराव शिबिर मार्च २०२२ मध्ये असून सराव संपल्यावर हे सर्व खेळाडू पुढील नेपाल व दुबई येथे होणाऱ्या अंतराराष्ट्रीय स्पर्धसाठी जाणार आहे. या अंतरराष्ट्रीय शुटींगबॅाल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडुचे असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष महाजन, सचिव के. आर. ठाकरे , उपाध्यक्ष अशोक चौधरी, अनिस पटेल, मसरूर अली यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

या अंतरराष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धसाठी निवड झालेल्या खेळाडुंचे नांव पुढील प्रमाणे – १७ वर्ष वयोगटातील मुले सैय्यद मोहम्मद हसन, शाहीद शेख , १७ वर्ष वयोगटातील मुलीमध्ये नौशाद चांदा आणी अनम समिर, तर १९ वर्ष वयोगटातील मुलामध्ये खेळाडु मोहम्मद अमन शेख, अफरोज काझी , सैय्यद मोहसीन अवबी , १९ वर्ष मुलीच्या गटामध्ये राधीका हेडे, अचल परदेशी आणी आर्शिया इनामदार यांचा समावेश करण्यात आला आहे .

Protected Content