मशीनमध्ये पाय अडकल्याने जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

मलकापूर प्रतिनिधी । तालुक्यातील भालेगाव येथील रणगाव शिवारात तूर काढण्याच्या मशीनमध्ये पाय अडकल्याने २० वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

पवन श्रीराम बावस्कर (वय-२०) रा. भालेगाव ता. मलकापूर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पवन बावस्कर हा रणगाव शिवारातील आपल्या शेतात रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शेतात तूर काढण्यासाठी परिवारासह आला होता. तुर काढण्याच्या मशिनवर काम करत असतांना संपुर्ण तूर काढून झाल्यानंतर शेवटच्या वेळी त्याचा पाय मशिनमध्ये अचानक पाय अडकल्याने गंभीररित्या जखमी झाला होता. त्यांला नातेवाईकांना तातडीने मलकापूर उपजिल्हा रूग्णालयात  उपचारार्थ दाखल केले. जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बातमी समजताच भालेगाव रणगाव शिवारातील परिसरात शोककळा पसरली होती .

Protected Content